महाशिवरात्रीच्या पूर्व दिनी श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन तहसीलदारांनी घेतला आढावा
हिमायतनगर, अनिल नाईक| महाशिवरात्री निमित्त आयोजित हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरातील ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन व धार्मिक कार्यक्रमाला दि.२७ पासून सुरुवात झाली आहे. या प्रसंगी येणाऱ्या सर्व भाविकांनी कोरोना नियमनाचे पालन करून श्री परमेश्वराचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार डी.एन. गायकवाड यांनी केले.
ते महाशिवरात्रीच्या पूर्व दिनी श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन नियोजन व भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुविधेची पाहणी करण्यासाठी आले असता मंदिर कमिटीच्या सदस्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीच्या चर्चेच्यावेळी बोलत होते. यावेळी सुरुवातील त्यांनी श्री परमेश्वरचे दर्शन घेतले. कोरोनामुळे दोन वर्षानंतर श्री परमेश्वराच्या अलंकार सोहळ्यातील श्रीमूर्तीचे कैलेंडर छापण्यात आले. प्रकाशित करण्यात आलेल्या श्री परमेश्वर मूर्तीच्या कैलेंडर तथा भिंतीपत्रकाचे विमोचन तहसीलदार गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले.
विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशासह राज्यातील कानाकोप-यातुन भावीक भक्त श्री परमेश्वर दर्शनासाठी हजेरी लावतात. गेल्या दोन वर्षापासन कोरोगामुळे अनेकांना श्रीदर्शन घेता आले नाही. यंदा यात्रा नसली तरी श्रीदर्शन घेता येणार असल्याचा आंदण भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. महाशिवरात्रीच्या रात्रीला शासकीय महापूजा श्रीचा अलंकार सोहळा मंदिर कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार दि.एन.गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सप्ताहाच्या शेवटी काल्याच्या कीर्तन दिनापर्यंत भाविकांना सप्ताह निमित्त विना पारायण, कीर्तन कोरोनाचे नियम पाळून श्री परमेश्वराचे अलंकारमय दर्शन घेता येणार आहे.
परंपरेनुसार महाशिवरात्री दिनी म्हणजे उद्या दि.०१ मार्च रोजी श्री परमेश्वर मूर्तीचा शासकीय पूजेने अलंकार सोहळा पुरोहितांच्या मधुर वाणीत पोलीस बंदोबस्तात केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बैंकेच्या लॉकरमधील दागिने श्री परमेश्वर मंदिरात पोलीस बंदोबस्तात आणून पंचनामा करण्यात आला. यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार डी.एन. गायकवाड, उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, अनंता देवकते, माधव पाळजकर, लताताई मुलंगे, मथुराबाई भोयर, अनिल मादसवार, पोलीस जमादार नागरगोजे, बाबुराव भोयर, मुन्ना शिंदे, देवराव वाडेकर, शिवाजी रामदीनवार, बंडू हरडपकर, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
Post a Comment