सोसायटीच्या जागेत एनडीसी बैन्केची स्वतंत्र इमारत उभी करण्यासाठी प्रयत्न करू - मा.आ.नागेश पाटील आष्टीकर - wadhona

wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज

हिमायतनगर सेवा सहकारी सोसायटीच्या चेयरमनपदी प्रवीण शिंदे यांची बिनविरोध निवड


हिमायतनगर (अनिल नाईक)
मागील अनेक वर्षांपासून हिमायतनगर नांदेड जिल्हा मध्यवर्ती बैंक हि भाड्याच्या इमारतीत चालविली जात आहे. या बैन्केला स्वतःच्या हक्काची इमारत व्हावी हि सर्वांचीच अपेक्षा आहे. ती अपेक्षा प्रत्यक्षात अमलात यावी म्हणून येणाऱ्या काळात सहकार खात्याच्या माध्यमातून सोसायटीच्या जागेत इमारत उभी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे आश्वासन माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले. ते हिमायतनगर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेयरमन -व्हाईस चेयरमन पदाच्या निवडी नंतर पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

नुकतीच हिमायतनगर येथील सोसायटीची निवडणूक अटीतटीत संपन्न झाली, यात शिवसेना प्रणित पैनलचे १० उमेदवार निवडून वर्चस्व स्थापित झाले होते. त्यानंतर काल दि.२० रविवार रोजी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी एल. टी. डावरे, सचिव एस.पिप.काकडे, राखीव सचिव बी.बी.शिंदे, गंगाधर मिरजगावे, रामेश्वर चव्हाण, यांच्या उपस्थितीत हिमायतनगर सोसायटीच्या चेयरमन पदी प्रवीण प्रकाशराव शिंदे, तर व्हाईस चेयरमन पदी शे.लाल शे.कादर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हि निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी माजी नगरसेवक प्रभार मुधोळकर यांनी एनडीसी बैंकेच्या इमारतीचा प्रश्न उपस्थित केला. अगोदरच एनडीसी बैन्केचा कारभार अडचणीत आला. त्यात भर म्हणून इमारत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांसह येथे व्यवहारासाठी ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. तसेच विनाकारण भाड्यावरही खर्च करावा लागतो आहे. हा खर्च वाचावा आणि बैन्केला इमारत उपलब्ध व्हावी अशी विनंती मुधोळकर यांनी केली. त्यावर लवकरच तोडगा काढू आणि येथील सोसायटीच्या जागेत स्वतंत्र इमारत उभारून शेतकरी व ग्राहकांना सोसोयटीच्या माध्यमातून होतील तेवढ्या सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले.    

            

wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज

Post a Comment

Previous Post Next Post