आ. माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या समय सुचकतेने व प्रा. राजेश कागणे यांच्या मार्गदर्शनाखाली 'क्रांतीला' MBBS ला प्रवेश - wadhona

wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज

 


विद्यार्थ्याची शिकण्याची जिद्द आणि पालकांची शिकवण्याची तळमळ असेल तर सर्व शक्य होते, असे उदाहरण 'क्रांती शिवदास पेंटेवाड' या विद्यार्थ्यांनीच्या बाबतीत देता येईल.यंदाच्या वर्षी क्रांतीला  NEET UG मध्ये चांगले गुण पडले, माझेकडे मेडिकल प्रवेश प्रक्रिया मध्ये सहभागी होण्यासाठी आले. मेडिकल प्रवेश राऊंड चा फॉर्म भरला पण जात वैद्यता प्रमाणपत्र मिळाले नव्हते. मेडिकलची 1ली यादी लागली त्यात क्रांतीचा नंबर फक्त 2 गुणांनी हुकला.      

पण जे झाल ते योग्यच कारण जात पडताळणी प्रकरण कोर्टात पेंडीग होते. वडील शिवदास पेंटेवाड (पोस्टमन)हे माझे विद्यार्थी. काय करावे मनात प्रश्न,पडताळणी प्रमाणपत्र मिळाले तरच मुलीचा MBBS ला प्रवेश होणार. शिवदास ने हायकोर्ट चे वकील यांचे  माझे बोलणे करून दिले व 2ऱ्या लिस्टमध्ये आपला नंबर लागणारच म्हणून कोणत्याही परिस्थितीत प्रमाणपत्र मिळावे हे मी त्यांना सांगितले.

त्यानंतर 8 मार्च 2022ला सकाली मेडिकल  5 वाजता MBBS ची दुसरी यादी लागली. आणि सोलापुर येथील "आश्विनी मेडिकल कॉलेजला" क्रांतीचा नंबर लागला. व दि 14 मार्च सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेशाची वेळ.  योगायोगाने कोर्टानेही 14 मार्च हीच तारीख दिली. आता पंचायत झाली जर प्रमाणपत्र मिळाले नाही तर प्रवेश नाही. शिवदास हताश होईल तो कसला माझा विद्यार्थी.... त्याला सांगितले तू औरंगाबाद ला हायकोर्ट येथेच थांब आणि मुलीला कोणासोबत सोलापुरला पाठव. 

दि 14 मार्च दुपार 12,  1 , 2, असे घडयाळाचे  आकडे पुढे पुढे सरकत होते. कॉलेज वाले म्हणाले जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर लगेचच प्रवेश होईल. हाय कोर्टात केसवर भैस झाली. मनात तळमळ होती , काय होईल काय नाही. आणि 5 वाजले, वकील बाहेर येईनात. आता सगळे संपले असे वाटताच वकील बाहेर आले आणि आपल्याला ऑर्डर मिळाली असे सांगितले. शिवदास भांबवुन गेला काय करावे समजत नव्हते. तशीच ऑर्डर घेऊन जात पडताळणी ऑफिसला गेला, व जातपडताळणी प्रमानपत्र घेई पर्यंत 5.30 वाजले. संबंधित कॉलेजला मेलवर प्रमाणपत्र पाठवतो म्हणाले तर त्यांनी नकार दिला आणि 5.00ची वेळ निघून गेल्याने आता प्रवेश असे सांगितले.

आता काय करावे,शिवदास औरंगाबादला,कॉलेज सोलापूरला. त्यातच त्याने मला फोन केला...     सर काही समजत नाही ,काय करू आता. प्रमाणपत्र मिळूनही प्रवेश होणार नाही. मी म्हणालो घाबरू नकोस. "एवढे प्रयत्न झालेत नक्कीच यश मिळेल." लगेचच कोणताही विचार न करता, आमदार श्री माधवराव पाटील जवळगावकर यांना फोन केला. आणि सर्व हकीगत सांगितली. साहेब काहीच वेळापूर्वी विधानसभा सभागृहातुन बाहेर आलेले होते. काहीही करा साहेब आपण  हे काम करू शकता असा आग्रह धरला. साहेब म्हणाले काय करावे लागेल.. मी संगीतले जर आपण *वैद्यकीय शिक्षण मंत्री अमितभैया देशमुख* यांच्या कानावर ही गोष्ट टाकली तर प्रवेश होतोच. साहेबांनी दिवसभर थकलेले असतांनाही क्षणाचा विलंब न करता माझ्याकडून व्हाट्सअप्प वर माहिती घेतली आणि योग्य ती कार्यवाही केली.यामध्ये माजी जि.प.सदस्य सुभाषदादा राठोड व माझा विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आणि रात्री 8 वाजता कॉलेजला निरोप आला की मेलवरील जातपडताळणी प्रमाणपत्र ग्राह्य धरून क्रांतीला MBBS ला प्रवेश द्यावा. धन्यवाद साहेब. आणि जिद्दी क्रांती व तळमळ व्यक्त करणारा माझा विद्यार्थी शिवदास पेंटेवाड (क्रांतीचे वडील) यांच्या प्रयत्नांना यश मिळाले अन क्रांतीचा MBBS ला प्रवेश मिळावा. माझेकडे शैक्षणिक सला घेतल्याने एक महत्त्वाचे काम झाले याचाही मला मनस्वी आनंद झालाव समाधान वाटले. क्रांतीला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा 

.....प्रा कागणे आर एस , (शैक्षणिक सल्लागार), हिमायतनगर जि नांदेड

wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज

Post a Comment

Previous Post Next Post