लोककलावंतांच्या न्याय व हक्कासाठी शासन दरबारी सदैव प्रयत्नशील - आ.माधवराव पाटील जवळगांवकर - wadhona

गुरुवर्य एम.पी.भवरे स्मृती पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान ; लोकपारंपारिक कलांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन.


हिमायतनगर ( अनिल नाईक)
आपल्या कलेच्या माध्यमातून लोकपारंपारिक कलावंतांनी प्रत्येक क्षेत्रांच्या उन्नतीसाठी प्रबोधनातून जनजागृती करावी जिल्ह्यातून दरवर्षी किमान ५०० कलावंतांना मानधन मिळावे यासह आपल्या विविध प्रश्नांच्या निवारणासाठी आपण शासनदरबारी जागरुकपणे प्रयत्नशील असून यापूढेही आपल्या न्याय व हक्कासाठी सदैव कर्तव्यतत्पर राहिल अशी ग्वाही हदगांव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आ.माधवराव पाटील जवळगांवकर यांनी दिली.

स्मृतीशेष गुरुवर्य एम.पी.भवरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड,बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र (सांस्कृतिक विभाग) व पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा व लोकपारंपारिक कलावंत शाहीर मेळाव्यात दि.१८ सप्टेंबर रोजी मौजे पोटा (बु.) येथे ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आ.माधवराव पा.जवळगांवकर हे होते.जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी.माळोदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन करण्यांत आले.

तर, व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी आर.एच.एडके, श्रीमती सुमनबाई भवरे,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ.उज्वला भवरे,जेष्ठ शाहीर व्यंकटराव बेटकबिलोलीकर, जिल्हास्तरीय मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन निवड समितीचे सदस्य के.डी. बेंबरे पाटील,कार्यकारी अभियंता अशोक भोजराज,अभि.संजय मेकेवाड,डाॅ.विलास ढवळे,जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड,से.नि. मुख्याध्यापक जि.पी.नरवाडे, समाजकल्याण विभागाचे विस्तार अधिकारी इंदूरकर,दिलीपराव कावळे,सरपंच प्रतिनिधी दत्ता पवार, उपसरपंच माधव डोखळे, साहित्यिक मारोती वाघमारे, कानबा पोपलवार,अभियंता स्वामी,जनार्दन मिरासे,विश्वांभर वानोळे यांच्यासह व्यासपीठावर मेळाव्याचे निमंत्रक कैलास माने पोटेकर, स्वागताध्यक्ष बालाजी राठोड,संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे,पत्रकार यशवंत थोरात,किरण वाघमारे,सिद्धार्थ गायकवाड, ग्रामविकास अधिकारी व्हि.जी.जकीलवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी गुरुवर्य एम.पी.भवरे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एस.व्ही.रामणा,सुप्रसिद्ध हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे,सिने अभिनेता डाॅ.के.मनेश,जिल्हा परिषदेच्या अति.मुख्य कार्यकारी यांचे स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड,जिल्हा कार्यक्रम अधिकारी मिलींद व्यवहारे, विस्तार अधिकारी डि.आय.गायकवाड,समाजकल्याण निरिक्षक श्रीमती एस.जी.वागतकर, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे,मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी,सहशिक्षक समाधान सुर्वे, गोपाल तुम्मलवार, समाजसेविका श्रीमती विजया काचावार,समतादूत दिलीप सोंडारे, कैलास गायकवाड आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मेळाव्याचे आयोजक लक्ष्मणराव मा.भवरे यांनी प्रास्ताविकातून आपली भूमिका विषद करतांना विविध क्षेत्रांत उत्तुंग योगदान देत कर्तव्यतत्पर असलेल्यांना प्रेरणा देण्यासाठीच आम्ही दरवर्षी  पुरस्कार प्रदान करित असल्याचे स्पष्ट केले.तसेच, समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या लोककलावंताचे सद्याचे प्रश्न मांडले.

याप्रसंगी पूढे बोलतांना आ.जवळगांवकर म्हणाले की, आपली संस्कृती जोपासीत प्रबोधनातून जनजागृतीचे महान कार्य लोकपारंपारिक कलावंत करित असतो.विविध समाजघटकांप्रमाणेच त्यांच्याही समस्या व न्याय,हक्काची जाणीव आपणांस असून त्यासाठी दरवर्षी मेळाव्यांच्या माध्यमातून बहुजन चळवळीतील अग्रेसर नेतृत्व असलेले आपले सहकारी त्रिरत्नकुमार मा.भवरे हे सर्वांना एकत्रित करुन कर्तव्यतत्परतेने कार्यरत असतात हि बाब आपणांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्याच माध्यमातून आपण आपल्या न्याय व हक्कासाठी सदैव प्रयत्नशील असून कोरोना महामारीच्या संकटात कोणत्याही प्रकारचे सांस्कृतीक कार्यक्रम नसल्याने संकटात सापडलेल्या लोकपारंपारिक कलावंतांनाही प्रत्येक समाज घटकांप्रमाणेच आर्थिक मदत मिळावी.

यासाठी राज्याचे त.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,माजी मुख्यमंत्री तथा,जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आ.अशोकराव चव्हाण व संबधित विभागाच्या तत्कालीन मंत्रीमहोदयांना भेटून आपण पाठपुरावा केला होता.त्यामुळेच अनेकांना आर्थिक लाभ मिळाला असून जिल्हास्तरीय मानधन निवड समिती पूनर्गठित व्हावी यासाठीही आपण प्रयत्नशील होतो.या माध्यमातूनही अनेकजण मानधनासाठी पात्र ठरले.परंतू, कलावंतांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात दरवर्षी किमान ५०० कलावंतांना मानधन मिळावे यासह अनेक प्रश्नांसाठी शासनदरबारी आपला सातत्याने पाठपुरावा सुरुच असल्याचे ते म्हणाले.गत दोन वर्षांपासून कलावंताचे रखडलेले मानधन वाटप व यंदाची रखडलेले प्रस्ताव मान्यतेसाठी त्यांनी यावेळी उपस्थित जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना निर्देश दिले व पुरस्कार प्राप्त व्यक्तींची जबाबदारी वाढल्याचे सांगून त्यांनी जोमाने समाजसेवेसाठी तत्पर व्हावे असे आवाहन यावेळी आ.माधवराव पाटील जवळगांवकर यांनी केले.

 या सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रा.उत्तम कानिंदे यांनी तर, उपस्थितांचे आभार डाॅ.मनोज राऊत यांनी मानले.या मेळाव्यात शाहीर रमेश नारलेवाड,शाहीर नरेंद्र दोराटे,शाहीर शंकर गायकवाड, गोरखनाथ मस्के,शाहिर बळीराम जाधव, शाहीर बापुराव जमदाडे, श्याम गायकवाड,सोनाली भोकरकर, संध्या नांदेडकर,देविदास उदगीरकर, सौ.पाटील, शाहीर सुभाष गुंडेकर,शेषेराव महाराज,किशन ठमके आदींनी आपली लोककला सादर केली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे यांच्यासह जगन्नाथ नरवाडे,सुर्यकांत खिराडे,शेख खय्युम,शिवाजी डोखळे,नागोराव मेंडेवाड,जळबा जळपते, परमेश्वर वालेगांवकर,गौतम राऊत,नागनाथ वच्चेवार,अविनाश कदम,प्रकाश कदम,केशव माने,बापुराव कदम,शेषेराव थावरा चव्हाण, लोकेश कावळे,पांडुरंग हापसेवाड,लक्ष्मीबाई मिरासे,सुरेखा डोखळे,लक्ष्मीबाई जळपते,सुनंदा मेंडेवाड,वनमाला वच्चेवार,लक्ष्मीबाई वालेगांवकर,सुमनबाई माने आदींनी विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्यास मराठवाडा- विदर्भासह लगतच्या आंध्रप्रदेश,तेलंगणा राज्यातील लोकपारंपारिक कलावंत तसेच,जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर,प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी, लोकप्रतिनिधी,पत्रकार व जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज