वाढोण्याची कुलस्वामिनी माता श्री कालिंका मंदिरात आ.जवळगावकरांनी केला सपत्नीक अभिषेक व अलंकार सोहळा - wadhona

wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज

नऊ दिवस मंदिरात नवरात्रोत्सवाचे विविध धार्मिक - सांस्कृतिक कार्यक्रम


हिमायतनगर 
(अनिल नाईक) प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोणा नगरीची कुलस्वामिनी माता कालिंका देवी मंदिरात नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. हिमायतनगर (वाढोणा) येथील नवसाला पावणाऱ्या माता कालिंका मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सकाळी १० वाजता कांता गुरु वाळके व साईगुरु बडवे यांच्या मधुर वाणीत हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर व त्यांच्या अर्धांगिनी यांच्या शुभ हस्ते मातेचा अभिषेक व अलंकार सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी महाआरती करून प्रसादाचे वितरण झाले, आगामी नऊ दिवस मंदिरात नवरात्रोत्सवाचे विविध धार्मिक - सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत अशी माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजीव रामदिनवार व सचिव समाज मारावार यांनी दिली आहे.


गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर हिमायतनगर वाढोणा शहराची कुलस्वामिनी माता कालिंका मंदिरात धुमधडाक्यात नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. नित्यनेमाने दररोज सकाळी ७ आणि रात्री ७ या वेळेत या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या माता दुर्गादेवीची महाआरती केली जाणार आहे. दि.२६  सोमवार ते दि.०४ मंगळावर पर्यंत दररोज दुपारी ०१ ते ५ या वेळेत संगीतमय देवी भागवत कथा हभप भगवंताचार्य ज्ञानेश्वर महाराज बरबडेकर यांच्या मधुर वाणीत होणार आहे. या कार्यक्रमाचे सौजन्य कै.पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मित्रमंडळाच्या वतीने लाभले आहे.  


सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन व भव्य महाप्रसादाचे आयोजन दि.०३ रोजी अष्टमी असल्याने होईल, दि.०४ मंगळवारी माता कालिंका देवीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी १० ते ०२ वाजेच्या दरम्यान महानवमी, होमहवन व पूर्णाहुती कार्यक्रम त्यानंतर काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे. दररोज सप्तसीती पाठाचे वाचन सकाळी ९ ते १२ वाजेच्या दरम्यान पुरोहित कांतागुरु वाळके हे करतील. दि.०५ बुधवारी दुपारी ०४ वाजेच्या दरम्यान माता कालिंका देवी मंदिरापासून ढोल तश्याच्या गजरात भव्य अशी दसरा मिरवणूक काढून, परत कालिंका मंदिरात आल्यानंतर समारोप केला जाणार आहे. हा उत्सव आनंदाने साजरी व्हावा यासाठी सर्व महिला -पुरुष मंडळी परिश्रम घेत आहेत.


या नवरात्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन कमेटीचे अध्यक्ष - राजेंद्र रामदिनवार, उपाध्यक्ष - दिलीप पार्डीकर, सचिव - संजय मारावार, सहसचिव - गजानन तीप्पणवार, कोषाध्यक्ष - ज्ञानेश्वर पंदलवाड, सदस्य - धर्मपुरी गुंडेवार, नारायण गुंडेवार, जीवन घोगरकर, शरद चायल, शिवाजी भंडारे, राजू जैस्वाल, आशिष सकवान, विजय मादसवार, योगेश चिलकावार, विनोद गुंडेवार, विष्णू रामदिनवार, गंगाधर माधव गुंडेवार, संजय बोड्डेवार, मनोज मादसवार, विनोद बिंगेवार, प्रदीप मादसवार, व्यंकटी पालिकोंडलवार, सौ.सुनंदा दासेवार, सौ.प्रेमाला गुंडेवार, सौ.प्रतिभा नप्ते, सौ.पार्वतीबाई रच्चेवार आणि समस्त गावकरी मंडळीं आणि नवरात्र महोत्सवाचे मनोज मादसवार, ज्ञानेश्वर शिंदे, गजानन गुंडेवार, योगेश गुंडेवार, विनोद गुंडेवार, विष्णू रामदिनवार, सुनील बिंगेवार, गणेश रामदिनवार, सुरज दासेवार, कृष्णा गुंडेवार, सुदर्शन गुड्डेटवार,  राजू चाटलेवार, गजानन मादसवार, गजानन चायल, कुणाल राठोड, विपुल दंडेवाड, सचिन ताडेवाड, लक्ष्मण ढोणे, राजूअप्पा बंडेवार, व्यंकटी पालीकोंडवार, अंकुश गुंडेवार, साईनाथ रामदिनवार, गजानन रामदिनवार, राजू राहुलवाड, गजानन गंगरपवाड, विठ्ठल गुंडेवार, जगदीश मादसवार, बालाजी रच्चेवार, पवन गुंडेवार, सोनू मादसवार, देविदास अलकटवार, तंटी गुड्डेटवार, प्रकाश रामदिनवार, रामकिशन मादसवार, परमेश्वर गुंडेवार, हनुसिंग ठाकूर, रामू नरवाडे, विलास वानखेडे, बालाजी यम्मलवाड, गजानन विठ्ठल मादसवार आदींसह समस्त गावकरी मंडळीनी केले आहे.

दरम्यान आज कालिंका मंदिर ट्रस्टच्या वतीने संपन्न झालेल्या अलंकार सोहळ्या नंतर मंदिर कमिटीच्या वतीने आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचा सपत्नीक स्वागत सत्कार करण्यात आला. प्रसंगी सौ.लताबाई मुलंगे, ज्योतीताई पार्डीकर, सुभाष राठोड, सुभाष शिंदे, संजय माने, बाळू चवरे, उदय देशपांडे, अनिल मादसवार, अनिल नाईक, आदींसह परिसरातील अनेक नागरिक, महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज

Post a Comment

Previous Post Next Post