सरसम येथे विद्यूत खांबाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह-NNL

wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज

घात पाताचा संशय. ... मयताच्या भावाची तक्रार


हिमायतनगर(अनिल नाईक)
तालुक्यातील सरसम बु. येथे  विद्यूत खांबाला गळफास लावून एका तरूणाची आत्महत्या. ही घटना दि.  २७ शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.  मयताच्या भावानी हिमायतनगर पोलीस ठाण्याला तक्रार देवून घात पाताचा संशय व्यक्त केला असून आरोपीचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 

सरसम बु.येथील रहिवाशी विकास ( सोनू ) नामदेव मंडलवाड वय ३० वर्ष हा दोन दिवसापूर्वी घरातून बाहेर पडला, तो परत आला नाही.  दि.  २७ च्या रात्री  त्याने गावाशेजारी असलेल्या  नंदकुमार दमकोंडवार यांच्या मालकीच्या शेतात विद्यूत खांबाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना सकाळी उघडकीस आली आहे. मयताचा भाऊ बालाजी नामदेव मंडलवाड यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात अशी तक्रार दिली की, माझ्या भावाने आत्महत्या केली नसून त्याचा घात पात झाला आहे.  


कोणीतरी माझ्या भावाचा खून करून आत्महत्या दाखविण्यासाठी प्रेत खांबाला लटकावले आहे.  सदर प्रकरणात आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई ची मागणी केली आहे. दरम्यान सद्यस्थितीत  हिमायतनगर पोलीस ठाण्कयात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ए.  एस.  आय.  श्रीमती कोमल कागणे हे अधिक तपास करीत आहेत.  प्रेताची उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकाच्या ताब्यात प्रेत दिल्यानंतर शोकाकुल वातावरणात मयत सोनू वर, उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज

Post a Comment

Previous Post Next Post