सरसम येथील अपंग शेतकार्याच्या शेतातील सौर ऊर्जेची मोटारपंप, बैटरीसह वीज स्टार्टर चोरी -wadhona

चोरट्याचा शोध लावून मोटारपंप मिळून देण्याची मागणी  


हिमायतनगर|
तालुक्यातील मौजे सरसम परिसरात पुन्हा चोरटे सक्रिय झाले असलयाचे पाहावयास मिळत आहे. नुकतेच एका शेतकऱ्याच्या शेतातील सौर ऊर्जेची मोटारपंप, बैटरी व स्टार्टर अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेहमीप्रमाणें सरसम येथील शेतकरी श्यामराव ज्ञानोबा खिराडे हे नित्याप्रमाणे शेतीचे कामे करून रात्रीला घराकडे गेले होते. दरम्यान आज्ञात चोरट्यानी रात्रीला संधी साधून त्यांच्या शेत सर्वे नंबर २४/१० मध्ये असलेल्या विहिरीवर बसविण्यात आलेली सौर ऊर्जेची मोटारपंप आणि स्टार्टर अज्ञात चोरट्यानी चोरून नेले आहे. दुसऱ्या दिवशी शेतकरी शेतात गेला असता मोटारपंप बैटरी आणि स्टार्टर चोरीला गेल्याचे दिसून आले आहे. यासाठी चक्क चोरट्यानी मोटार पंपाजवळील पाईप कापून मोटार व इतर साहित्य चोरून नेऊन शेतकऱ्याचे २.५ लाखाचे नुकसान केले आहे.


याबाबतची तक्रार अपंग युवा शेतकरी श्यामराव ज्ञानोबा खिराडे हिमायतनगर पोलीस ठाण्यात दिली असून, या चोरट्यांचा शोध लावून मोटारपंप मिळून द्यावी अशी मागणी केली आहे. मोटारपंप चोरीला गेल्यामुळे माझ्या शेतातील रब्बीची गहू, हरभर वाळून जात असल्याचे शेतकऱ्यांनी म्हंटले आहे.     

Post a Comment

Previous Post Next Post
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज