विश्व हिंदू परिषदेच्या निवेदनांतर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेने कार्यवाहीला सुरुवात
हिमायतनगर| शहरातील राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या मोकळ्या जागेत दिनांक 17 जुलै 2019 रोजी नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे याच्या मार्गदर्शनाखाली, भोकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वात मोठ्या फौजफाट्यासह बेवारस ठेवलेले नऊ गोवंश जप्त करण्यात आले आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेळीच अंकुश आणल्याने यावरून शहरात होणार मोठा वाद थांबविण्यात पोलिसांना यश आले आहे.
राज्यात गोहत्या बंदी असताना देखील गोवंशाची कत्तल होते, तसेच या ठिकाणहून गोवंशाची तस्करी तेलंगणा राज्यात केली जाते त्यामुळे येथे २५ ते ३० जनावरे एकत्र ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर यांनी हिमायतनगर शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या जुन्या तहसील तथा सध्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या शेजारी छापा टाकून गोवंशाच्या जप्तीची कार्यवाही केली. याबाबत केवळ डायरीवर अज्ञाताची जनावरे म्हणून किनवट युएथील गोशाळेत सुरक्षेसाठी पाठविले असल्याची नोंद घेण्यात आल्याचे पोलीस सुत्रानी सांगितले आहे. आगामी काही दिवसावर बकरी ईद उत्सव असल्यामुळे जनावरे या ठिकाणी आणून कत्तल करण्यासाठी बांधली होती काय..? कि हि जनावरे तेलंगणा राज्यात विक्रीसाठी पाठविण्यात येणार होती का..? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांतून पुढे येत आहे.याबाबतची माहिती मिळताच कार्यवाहीच्या भीतीपोटी हिमायतनगर शहरात इतर ठिकाणी बांधून ठेवलेले अनेक गोवंश इतरत्र हलविन्यात आल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे केव्हाही कुठेही आपल्यावर कारवाई होऊ शकते, अशी भीती काल झालेल्या या कारवाईने गोवंशाच्या कारभारात हात असलेल्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. एकीकडे गोवंश जप्तीची कारवाई चालू असताना गोवंशाची देवाण-घेवाण करणारे मात्र आपापले गोवंश लपवण्यामध्ये व्यस्त होते अशी माहिती सोशल मीडियावर वायरल झाली असून, याची एकच जोरदार चर्चा शहर व परिसरात सुरु आहे.
शहरात वेळोवेळी होत असलेल्या शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये सामाजिक सलोख्याच्या आणि सद्भावनेचा गप्पा मारणाऱ्या काही नेत्यांनी स्वयंस्फूर्तपणे हिमायतनगर येथील गोहत्या करणाऱ्याची पाठराखण केली. हे कालच्या कारवाई दरम्यान दिसुन आले आहे. अशा संकटाच्या वेळी हिंदू नेते स्वयंस्फूर्तपणे हिंदु समाजाच्या पाठीमागे पणे उभे राहतील का ? असा प्रश्न समस्त हिंदू बांधवाना पडला आहे. राज्यात गोहत्या बंदी असताना देखील गोवंशाची कत्तल करणा-याच्या पाठीमागे छोटे-मोठे नेते ठामपने उभे होतात. ज्या गाईला गोमाता म्हणुन हिंदु पुजा करता, त्या गोमातेची कत्तल करणा-याच्या पाठीमागे रहाणा-या नेत्यांचा मी जाहीर निषेध करतो. अशी संतापजनक प्रतिक्रिया किरण सुभाष बिच्चेवार, जिल्हामंत्री, विश्व हिंदु परिषद किनवट तथा, देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र, पवना, तालुका हिमायतनगर यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने कार्यवाही केली, त्यावेळी २५ ते ३० जनावरे होती, त्यापैकी १५ जणांचे दाखले उपलब्ध झाल्याने ती जनावरे संबंधितांना देण्यात आली. त्यामध्ये ४ म्हशी असून, नऊ जनावरे किनवट येथे गोशाळेत पाठविली आहेत. याची नोंद करण्यात आली असून, हि जनावरे कश्यासाठी आणण्यात आली याची चौकशी सुरु असून, जनावरांच्या मालकांच्या नावे समजताच तपस करून गुन्हा दाखल केला जाईल.
إرسال تعليق