उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे यांची आकाशवाणीवर मुलाखत - wadhona

नांदेड। माझी वसुंधरा अभियान टप्पा-२ संदर्भात नांदेड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत बुधवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे. 

या मुलाखतीमधून त्यांनी माझी वसुंधरा अभियानातंर्गत गावस्तरावर राबविण्यात येणारे उपक्रम व गावकऱ्यांचा सहभाग यासंदर्भात माहिती दिली आहे. तरी ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी ही मुलाखत ऐकावी, असे आवाहन नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी तथा कार्यालय प्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज