अखील भारतीय कैकाडी महासंघाने केली मुख्याधिकाऱ्याकडे मागणी
हिमायतनगर(अनिल नाईक)वाढोणा शहरातील परमेश्वर गल्लीमध्ये जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर अनेक वर्षापासून असलेले श्री हरणाबाई मंदिर (आडेली मंदिर) च्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले जात आहे. हे बांधकाम तयकल थांबविण्यात यावे अशी मागणी अखील भारतीय कैकाडी महासंघाने केली मुख्याधिकाऱ्याकडे निवेदन देऊन केली आहे.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, श्री हरणाबाई मंदिर (आडेली मंदिर) ची जागा ही सटवा महादु जाधव यांच्या स्वतःच्या मालकीची होती. ती समाजासाठी गल्लीतील भक्तांच्या श्रद्धेचा विचार करून त्यांनी स्वर्गीय हरणाबाई जाधव ही आडेली देवीचे अत्यंत निष्ठावंत भक्त असल्याने हरणाबाई मंदिरास (आडेली मंदिरास) दान म्हणून दिली होते. त्यानंतर मंदिरात भक्ताकडून आर्थिक दान मिळत असल्याने स्वर्गीय आडेलाबाई यांनी चांगले मध्यम असे पत्राचे मंदिर मातीच्या साह्याने बांधकाम केले होते.
तसेच याच मंदिरासमोर एक विशाल असे कडुलिंबाचे झाडे होते त्या झाडाखाली दर्शनास आलेले भक्त विश्राम करत असेत त्या मंदिरात नेहमी सणासुदीच्या दिवशी हिमायतनगर शहरातील व कैकाडी समाजातील महिला व पुरुष दर्शनास येत राहायचे. सदरील आडेला देवी मंदिर हे शहरातील व कैकाडी समाजातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. स्वर्गीय हरणाबाई ही अडीली देवीची एक निष्ठावंत भक्त होती व त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य हे देवीसाठी समर्पित केले होते. याबाबत शहरातील सर्व लहान थोर लोकांना याची माहिती सुद्धा आहे.
असे असतानाही या मंदिराला लागून असलेले श्रीमती शेशिकला भ्र.संभा जाधव यांच्या घराशेजारी हे मंदिर असल्या कारणाने त्या मंदिरावर मागील दोन ते तीन वर्षापासून मंदिराचे जुने बांधकाम थोडेथोडे पाडून ते मंदिर नष्ट करून अतिक्रमण केले असे समाज माध्यमातून सांगली जाते. या मंदिरा शेजारी मोकळ्या जागेमध्ये त्यांच्या घरातील मुकी जनावरे जसे की शेळ्या-मेंढ्या या ठिकाणी बांधून मंदिराचे पावित्र्य नष्ट करण्याचे कार्य त्यानी केले आहे. याबाबत समाजातील आम्ही खालील सही करणारे सर्व लोक वेळोवेळी आम्ही त्याला समजून सांगितले असताना मोठे वाद होत होते.
त्यानंतर त्यांनी त्या अतिक्रमण जागेवर आमच्या समाज बांधवाना तर्फे आम्ही सामुदायिकरीत्या जाऊन पूजा-अर्चना करत होतो पण मागील या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी अचानक रित्या ते मंदिर नष्ट करून त्यांनी त्या जागेवर आपल्या नगरपंचायत कार्यालयाकडून बांधकाम परवानगी न घेता शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाचे काम चालू केले आहे या अगोदर पण अनेक वेळा त्यांच्यासोबत तेथील समाज बांधव सोबत या मंदिरा संबंधी तोंडी वाद-विवाद झालेले आहे. त्यावेळेस काही खोटे गुन्हे नोंद केले देखील होते व येणाऱ्या काळात सुद्धा यांच्याकडून सर्व समाजाच्या बांधावर खोटे गुन्हे नोंद होण्याची शक्यता आहे व जीवित्वास पण मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असे निवेदन पत्र मध्ये नमूद केले आहे. याची संबंधित प्रशासनाने नोंद घ्यावी.
तरी समस्त कैकाडी समाज व भाविक भक्तांच्या भावनेचा उद्रेक होण्याआधी संबंधित नगरपंचायत प्रशासनाने अतिक्रमित जागेवरील समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या देवीच्या मंदिराचे अतिक्रमण काढून दोषीवर कठोरात काठोर कारवाई करावी. आणि करून परमेश्वर गल्लीतील, हिमायतनगर शहरातील समाजातील लोकांच्या देवीची जागा भक्तांच्या स्वाधीन करावी. जेणेकरून त्या ठिकाणी पूर्वी असलेली हरणाबाई मंदिर (आडेली मंदिर) उभारण्यात येईल.
येत्या आठ दिवसाच्या आत आपल्या नगरपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत प्रशासन राहील असे दिलेल्या निवेदन पत्रामध्ये लिखित स्वरूपामध्ये म्हंटले आहे. या निवेदनावर राम जाधव, पोषणबाई जाधव, पांडू कॅनेरी, आडळुबाई गाडगे, पपलू जाधव, गणपत गाडगे, संभाजी जाधव, पोष्टती जाधव, आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या पार्टी त्यांनी जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा धर्मदाय आयुक्त नांदेड, उपविभागीय अधिकारी हादगा, तहसीलदार हिमायतनगर याना पाठविल्या आहेत.
إرسال تعليق