वाशी जंगलात दगडाने ठेचून खून करणाऱ्या आरोपीताना पोलीस कोठडी; खून पोलिसांचा तपास सुरु - wadhona

मृतदेहा शेजारी तांब्या, लिंब, फूलाचे साहित्य आढळून आल्याने नरबळीचा असल्याचा नातेवाईकांचा संशय


हिमायतनगर (अनिल नाईक)
हिमायतनगर तालुक्यातील वाशी जंगलात शहरातील लाकडोबा चौक भाताची एका तरूणाचा दगडाने ठेचून निघृन खून करण्यात आल्याची घटना दि.गुरूवार ०८ रोजी दुपारी ०३ घडली आहे. या घटनेतील चार आरोपींताना पोलीसांनी ताब्यात घेवून ३०२ चा गुन्हा दाखल केला आहे. दगडाने ठेचून खून केल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून, प्रेताच्या शेजारी तांब्या, लिंब, फूल असे साहित्य आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार आहे की.. काय? असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. दि.१० शनिवारी न्यायालसमोर उभे केले असता न्यायाधीश महोदयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठवाठा, तेलंगणा बॉर्डरवर वाशी शिवारात हिमायतनगर शहरातील लाकडोबा चौक भागात राहणाऱ्या  मयत युवक पांडूरंग लक्ष्मण तोटेवार वय ३२ वर्ष याचा मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतला आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मयत युवक हा सासरवाडीला जाण्यासाठी उमर चौक येथील रस्त्यावर थांबला होता. यावेळी आरोपीतांनी ऑटो घेऊन मयत युवकांस आम्ही कुबिरकडे चाललो तुळसुद्धा सोडतो म्हणून घेऊन गेले. त्याच्या २ तासानंतर घरी अपघात झाला म्हणून फोन आला. त्यावरून नातेवाईक घटनास्थळावर गेले असता हा अपघात नाही खून असल्याचा संशय व्यक्त केला. मयत युवकाला काहितरी अमिष दाखवून आरोपी घेवून गेले आणि तिथे त्याचेवर हल्ला करून डोक्यात दगडाने वार करून निघृन खून केला आहे.


या आरोपीतामध्ये एका महिलेचाही सहभाग असून, मयत युवकाच्या शेजारी एक तांब्या, लिंब, फूलं, नारळ असे साहित्य आढळून आले असल्याने हा प्रकार नरबळीचा असल्याचा संशय तक्रारकर्ते नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मृतदेह एवढं छिन्नविछिन्न झाला कि, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात मृतदेह आरोपी ओढत असल्याचा एक व्हिडिओ देखील असल्याचे सांगण्यात आले आहे. हिमायतनगर पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ विकास उर्फ बालाजी लक्ष्मण तोटेवार वय ३८ वर्ष रा. लकडोबा चौक हिमायतनगर यांनी फिर्यादीवरून आरोपी परमेश्वर लक्ष्मण आकलवाड, लक्ष्मण आकलवाड, रमेश लक्ष्मण आकलवाड, लक्ष्मीबाई लक्ष्मण आकलवाड रा. सर्व  लकडोबा चौक हिमायतनगर जि. नांदेड यांचे विरूद्ध जूना वाद उकरून काढून मयत पांडुरंग लक्ष्मण तोटेवार वय ३२ वर्ष रा. लकडोबा चौक हिमायतनगर याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असल्याची नोंद पोलीस दफ्तारी करण्यात आली असून, गुरन. २०६/ २०२२ कलम ३०२,३४ भादंवि प्रमाणे खुनाचा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

सर्वच आरोपीना तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन हे करीत आहेत.  दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य तपस करण्याच्या सुचना केल्या आहेत. मयत व आरोपी हे एकाच परिसरात राहणारे असून, त्यांनी मयतास कोणते तरी आमिष दाखवून वाशीच्या जंगलात नेवून खुन केला असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. हा खुन कश्यामुळे आणी कोणत्या कारणास्तव झाला.. हे पोलीस तपासाअंती स्पष्ट होणार असून, घटनेविषयी अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. दरम्यान शनिवार दि.१० रोजी आरोपींस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

أحدث أقدم
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज