मृतांमध्ये 4 बिहारी कामगारांसह एका ट्रक चालकाचा समावेश; ४ गंभीर जखमी
हिमायतनगर (अनिल नाईक) नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोनारी फाटा आणि करंजी जवळ एका भरधाव वेगातील ट्रकने आयचरला एवढी जबरदस्त धडक दिली. कि या दुर्घटनेत 5 जन जागीच ठार झाले आहेत. यात ४ बिहारी मजूर आणि १ ट्रक चालकाचा समावेश आहे. तर अन्य 4 जन गंभीर जखमी तर १ व्यक्तीला किरकोळ मार लागला आहे. ही घटना सायंकाळी 7 वाजून 45 मिनीटांनी घडली असून, जखमींवर सरसम येथे प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविले आहे. या अपघाताच्या घटनेत मृतांचा आकडा कमी अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघात एवढा गंभीर होता कि आयचार टेम्पोचा वरील भागाचा चांगलाच चुराडा झाल्याचे दिसते आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि.२४ च्या सायंकाळी हिमायतनगर भागात रेल्वे इलेकट्रीक लाईनचे काम करून हे सर्व बिहार मजूर हिमायतनगरहून - भोकर येथे कामासाठी ८ मजूर जात होते. सायंकाळी ते बसून जात असलेल्या आयचार वाहन क्रमांक एम एच २६ जे ००१६ ला भरधाव वेगातील भोकर कडून येणाऱ्या सिमेंटच्या ट्रक क्रमांक एम एच २६ बीई १०११ ने येथील वेयर हाऊसच्या नजीक जबर धडक दिली. या वाहनातील ५ जन जागीच ठार झाले. तर यातील जखमींना सोनारी येथील युवकांनी बाहेर काढून सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
या जखमींपैकी एक मजूर हिमायतनगर येथील अरविंद शिवाजी बनसोडे, अन्य ४ जण बिहार येथील मजूर आहेत. या सर्वावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमीक उपचार करून नांदेडला रेफर केले आहे. मयतामध्ये शे.रफिक शमशेरोद्दीन, वय २५ वर्ष, रा मालदा, पश्चिम बंगाल, मोहम्मद नबिरुद्दीन मोहम्मद खामीरुद्दीन, वय २७ वर्ष रा.मालदा, पश्चिम बंगाल, मो.धिक्कन मो तालंन, वय १९ वर्ष, रा मालदा, पश्चिम बंगाल, प्रकाश मारोती गिमेकर, वय ४५ रा.फुलेनगर, हिमायतनगर (ट्रकचालक), साईनाथ बाबाराव पांचाळ वय ४३ रा.रेणापूर, ता.भोकर यांचा समावेश आहे. एकूणच अपघाताचा हा शनिवार त्यांच्यासाठी घातवार ठरला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर व त्यांच्या सहकार्यांनी भेट दिली. तर मृतांच्या डेडबॉडी ताब्यात घेण्यासाठी आणि जखमींना रुग्णालयात दखल करण्यासाठी तातडीने ऍम्ब्युलन्स दखल झाली होती.
إرسال تعليق