हिमायतनगर (अनिल नाईक) तालुक्यातील बोरगडी भागात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते आहे. परंतु यंदा या शेतकऱ्यांना अटीवर्षीचा मोठा फटका बसला असून, दोन वेळा बियाणे पेरल्यानंतरही म्हणाव त्याप्रमाणे उत्पन्न निघाले नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित उत्पन्नातून खर्च काढण्याची वेळ आली आहे. सध्या येथील फुलांना तेलंगणा राजात मोठी मागणी असून फुलांना होलसेल दरात 49 रुपये किलो प्रमाणे भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतेही मदत मिळत नसल्याचे खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
إرسال تعليق