हिमायतनगर प्रार्थना मंदिरात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी -Wadhona


हिमायतनगर (अनिल नाईक) 
शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिरात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी साजरी करण्यात आली.

येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष विठ्ठलरावजी फुलके यांच्या संकल्पनेतून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिरात दि.२८ नोव्हेंबर रोजी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १२ महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पूजन करून सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर विठ्ठल रावजी फुलके, संजय पाटील दुधडकर, विठ्ठलराव देशमवाड, परमेश्वर इंगळे, संभाजीराव अक्कलवाड, परमेश्वरजी अक्कलवाड, गोविंदराव पाटील टेंभीकर यांनी विचार व्यक्त केले.

त्यानंतर सायंकाळी हरिभक्त परायण श्री गोपाळराव महाराज मुजळेकर व श्री विठ्ठलराव फुलके यांनी महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर भजन गायली. या कार्यक्रम प्रसंगी प्रार्थना मंदिराचे अध्यक्ष रामराव पाटील सोनारीकर, उपाध्यक्ष गणपतराव इंगळे, परमेश्वरजी मादसवार, यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोतना गड्डमवार व गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शेवटी राष्ट्रवंदना व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा फुले यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला तसेच उपस्थित झालेले सर्वांचे फुलके काका यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज