डिवाएसपी शफाकत आमना यांची हिमायतनगरच्या जुगार अड्यावर धाड..दोन आरोपीस मुद्देमाल अटक - wadhona

wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज


हिमायतनगर (अनिल नाईक)
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे, अवैध दारूविक्री व मटक्याचा धंदा जोमाने सुरू आहे. हा प्रकार सुरू स्थानिक पोलीस प्रशासनाच्या आशिर्वाद आणि खाबूगिरी व्रत्तीमुळे होत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांना व राजकीय पदाधिकारी यांच्याकडून केला जात आहे. हे धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी होत असताना याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर नव्याने उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार घेतलेल्या डीवायएसपी शफाकत आमना मॅडम यानी हिमायतनगर शहरात चालविल्या जाणाऱ्या मटका अड्ड्यावर धाड टाकून दोघांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाही मूळ शहरात अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहर हे अवैध धंद्याचे माहेरघर म्हणून नावा रुपाला येत आहे. त्यातच चौपाटी परिसरात तर दिवसरात्र अवैध धंदे सुरू असतात त्यावर हिमायतनगर येथील पोलीस प्रशासनाची जरब नसल्याने अवैध धंदे करणाऱ्यांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे भोकर येथे नव्याने आलेल्या डीवायएसपी यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे मागील बऱ्याच दिवसापासून शहरात बंद झालेला मटका आणि जुगार काही ठिकाणी छुप्या मार्गाने सुरू होता. ह्या घटनेवर पोलिसांनी पाळत ठेवून दिनांक ०१ डिसेंबर रोजी डीवायएसपी यांच्या पथकाने चौपाटी परिसरातील जुगार अड्यावर धाड टाकून तेथील ७६६०  रुपयांचा मुद्देमाल व दोन आरोपींना जेरबंद केले आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरात अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले असल्याचे पाहायला मिळाले ह्या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बी. डी भुसनुर हे करीत आहेत.

wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज

Post a Comment

Previous Post Next Post