मलेश्वर शेंनेवाड बोरगडीकर यांनी पटकावली मानाची कुस्ती..
गावचे प्रथम नागरिक सौ.मेघा पवन करेवाड यांच्या तर्फे मानाच्या कुस्तीसाठी रोख रक्कम 2001 रु व शाल श्रीफळ ठेवण्यात आले होते.शेवटची मानाची कुस्ती सिरंजनी येथील नामवंत पैलवान हनुमान कलेवाड व बोरगडी येथील पैलवान मलेश्वर शेंनेवाड यांच्यात रंगली. खूप वेळ चाललेल्या ह्या रंगतदार कुस्तीत बोरगडी च्या पैलवनाने बाजी मारली.
गावातील मारोती मंदिरात विजयी पैलवान यांना पारितोषिक देऊन कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली. हा फड यशस्वी करण्यासाठी गणेश भींबरवाड, दत्ता म्याकलवाड, अविनाश अंचेटवाड,दयाकर सुदेवाड, दत्ता मिस्त्री यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून पै.जयवंतराव देशमाने, पै.बब्रुवाहन गडमवार, राजेश्वर कोंगरवाड, देविदास करेवाड यांनी जबाबदारी चोख पणे पार पडली.
إرسال تعليق