हिमायतनगर शहराजवळील टेम्भी फाट्यावर दुचाकी अपघात, एक ठार, तीन जखमी-Wadhona

 तीन जण गंभीर जखमी उपचारासाठी नांदेडला हलविले 


हिमायतनगर (अनिल नाईक) 
तालुक्यातील मौजे खडकी टेंभी फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याची घटना रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेेेत 1 ठार 3 गंभीर जखमी झाले, जखमींना तातडीने रुग्णालयात उपस्थित नागरिकांनी आनले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने नांदेडला हलविण्यात आले आहे. 


हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी एका कारणे दुचाकीला उडवल्याने तिघा जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची आठवण विसरन्यापुर्वी आज दिनांक 18 मार्च रंगपंचमीच्या दिवशी दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली आहे. यापैकी एक दुचाकी ही टेंभी गावाकडून येत होती तर दुसरी दुचाकी  हिमायतनगर मार्गाकडून खडकीकडे जात होती. टेंभी रस्ता व खडकी फाटा जवळ येताच भरधाव वेगात असलेल्या या दोन्ही वाहनांची समोरा- समोर जबर धडक होऊन विशाल विष्णू इंगळे वय 16 वर्ष राहणार जनता कॉलनी,  हिमायतनगर हा ठार झाला असन, सुरज संजय हरडपकर वय १९ वर्ष रा. परमेश्वर गल्ली हिमायतनगर, पिंटू हट्टू राठोड वय ३५ वर्ष रा.रामेश्वर तांडा, सुधाकर जाधव वय ३० वर्ष रा.रामेश्वर तांडा हे तीन जन गंभीर जखमी झाले आहेत.


ही धडक एवढी गंभीर होती की, दोन्ही दुचाक्या जवळपास शंभर फूट दूर अंतरावर जाऊन पडल्या. त्यापैकी एक वाहनधारक तर रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये पडला होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, तर दुसरे वाहनावरचे दोघे व अन्य एक जण खाली पडून त्यातील एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याने अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव पडल्याचे पहावयास मिळाले. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपस्थित नागरिकांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनातून आणले. या घटनेचे वृत्त लिहिपर्यंत तीन जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले असून, त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. 


एकीकडे सर्वत्र होळी धुळवडीचा उत्सव आनंदाने साजरा होत असताना हिमायतनगर तालुक्यात पूर्ण आज एक अपघात घडला आहे. त्यामुळे हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्ग अपघाताचा मार्ग बनला असल्याचे दिसते आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन तातडीने स्टॉपेज असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील फाट्यावर स्पीड ब्रेकर बसवावे आणि दोन्ही रस्त्याच्या मधोमध डीवाईडर करून होणाऱ्या अपघाताला थांबविण्यासाठी प्रयत्न करावे. अशी रास्त मागणी घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांतून केली जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज